नाशिक- गेल्या पाच दिवसांपासून नाशिक दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिक येथे पत्रकार परिषद घेतली. आज या दौऱ्याची सांगता होत आहे. येथे मोठा प्रतिसाद मिळाला, पुन्हा जानेवारीत नाशिकमध्ये येईल असा विश्वास नाशिककरांना राज यांनी दिला या दौऱ्यावर लोकांनी मला प्रचंड प्रतिसाद दिला असल्याचे त्यांनी सांगितले.
मला लोक नेहमी विचारता की गर्दीचं रुपांतर मतात कसं होणार मात्र 2014 वगळता 2009 मध्ये गर्दीचं रुपांतर मतात झालं होतं. आणि यावेळी तर ते होणारच आहे. ही गर्दी हेच सांगतेय जनतेचा शिवसेना-भाजपवर विश्वास नाही. 5 राज्यांत जी अवस्था झालीय, त्यापेक्षा वाईट अवस्था भाजपची महाराष्ट्रात होईल. कारण ज्या पद्धतीने सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. त्यामुळे जनतेला मोदी आणि भाजपवरुन विश्वास उडाला आहे. पाच राज्यांच्या निवडणूकावरुन जनतेला भाजप नकोय हे चित्र स्पष्ट झालं आहेच. त्यापेक्षा जास्त महाराष्ट्रात होईल आणि भाजप पेक्षा जास्त शिवसेनेची दुर्दशा होईल. शिवसेने कडे मला तर पाहायला सुद्धा आवडत नाही.
यावेळी बोलताना राज यांनी नसिरुद्दीन शहा यांच्या बोलण्याला समर्थन करत म्हणाले की देशातील वातावरण घाण झालंय हे निश्चित, नसिरुद्दीन यांची चिंता खरंच लक्षात घेण्यासारखी आहे. लोकसभा-विधानसभा एकाचवेळी घेणं शक्य नाही, एकावेळी फावडं आणि कुऱ्हाड मारुन घेणार नाहीत. आधी फावडं मारुन घेतील मग कुऱ्हाड मारुन घेतील असा टोला राज ठाकरे यांनी लगावला. मी मंत्र्यांना कांदे फेकून हाणायला सांगितले तर त्याचा परिणाम दिसून आलाच राजू शेट्टींच्या माणसांनी माझे बोलणे अमलात आणले असेही ते यावेळी बोलताना म्हणाले